क्राईमजळगावमहाराष्ट्र

पाचोरा बस स्थानक परिसरात गोळीबार, एक जण गंभीर जखमी.!!!

पाचोरा बस स्थानक परिसरात गोळीबार, एक जण गंभीर जखमी.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात आज (दि. ४ जुलै) दुपारी एक धक्कादायक घटना घडली असून, पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या गोळीबारात एक युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीच्या आधारे, ही घटना जुन्या वादातून घडल्याचं बोललं जात आहे. गोळीबार झाल्यानंतर काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पाचोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

गोळी लागलेल्या युवकाची ओळख अद्याप स्पष्ट झाली नसली तरी, त्याची प्रकृती चिंताजनक असून, पुढील उपचारासाठी त्याला जळगाव हलवण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

ही घटना पूर्वीच्या दुश्मनीतून घडली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुरावे यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सविस्तर माहिती थोड्याच वेळात…

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!