घोडदे येथे अवैध वाळू उत्खननावर धडक:संयुक्त कारवाईत ८ ट्रॅक्टर ताब्यात, अवैध वाळू माफियांना चपराक.!!!
घोडदे येथे अवैध वाळू उत्खननावर धडक:संयुक्त कारवाईत ८ ट्रॅक्टर ताब्यात, अवैध वाळू माफियांना चपराक.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव शहरातील घोडदे परिसरात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने गुरुवारी पहाटे जोरदार कारवाई केली. या कारवाईत एकूण ८ ट्रॅक्टर वाळू सह ताब्यात घेण्यात आले असून, संबंधित वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांच्या नेतृत्वात पो.ना. मनोहर पाटील, पो.कॉ. महेंद्र चव्हाण, प्रविण परदेशी, होमगार्ड किशोर पाटील, संजय परदेशी आणि विनोद जाधव यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली.
महसूल विभागाकडून ग्राम महसूल अधिकारी संजय सोनवणे, ग्रामसेवक अमोल पाटील, विशाल सूर्यवंशी आणि समाधान माळी यांनी ही मोहीम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला.
या कारवाईमुळे परिसरात अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यातही अशा धडक मोहिमा राबवण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.