पोलीसांनी कुंटणखान्याचा पर्दाफाश; दोन मालकिणींना कोठडी, ९ महिलांची सुटका.!!!

0 1,244

पोलीसांनी कुंटणखान्याचा पर्दाफाश; दोन मालकिणींना कोठडी, ९ महिलांची सुटका.!!!

अमळनेर प्रतिनिधी :-

अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात पोलिसांनी छापा टाकून सुरू असलेला देहविक्रीचा रॅकेट उघडकीस आणला आहे. या कारवाईत दोन महिला मालकिणींना अटक करण्यात आली असून, पीडित ९ महिलांची सुटका करून त्यांना जळगाव येथील आशादीप महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. शशिकला मदन बडगुजर (वय ५०) व मीना दीपक मिस्तरी (वय ६०) या दोघींवर इतर महिलांकडून देहविक्री व्यवसाय करवून घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून दोघींना अटक केली, तसेच तेथे उपस्थित ९ ग्राहकांनाही ताब्यात घेतले.

सदर ग्राहकांवर भारतीय दंड विधान कलम ११२ व ११७ अंतर्गत कारवाई करून त्यांना नातेवाइकांच्या ताब्यात सोपवण्यात आले. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोन्ही मालकिणींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित महिलांना न्यायालयाच्या आदेशानुसार जळगाव येथील आशादीप महिला सुधारगृहात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हलविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!