भडगावात गाडीच्या बॅटऱ्या चोरीप्रकरणी दोन चोरट्यांना अटक – ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.!!!

0 1,470

भडगावात गाडीच्या बॅटऱ्या चोरीप्रकरणी दोन चोरट्यांना अटक – ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहरात विविध ठिकाणांवरून वाहनांच्या बॅटऱ्या चोरीच्या घटनेचा भडगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण ६३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि. २१ जून २०२५ रोजी रात्री १० ते २२ जूनच्या सकाळी ५ वाजेच्या दरम्यान भडगाव शहरातील समीर स्कूल, ग्रीनपार्क कॉलनी व अन्य भागांतून EXIDE कंपनीच्या आयसर ट्रक व ट्रॅक्टरच्या एकूण ९ बॅटऱ्या तसेच एक दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद समीर स्कूल जवळील रहिवासी नासिरखान रशिद खान (वय ५२) यांनी दिली होती. यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला. तपासाधिकारी सफा/१८४ प्रदीप चौधरी यांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने दोन संशयितांची माहिती मिळवली.

त्यावरून भडगाव येथील समीर शेख कदीर शेख आणि शोएब सय्यद मुनव्वर (रा. ग्रीनपार्क कॉलनी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे:

EXIDE कंपनीच्या एकूण ९ बॅटऱ्या, किंमत सुमारे ₹५३,०००

TVS कंपनीची एक काळी वेगो दुचाकी (MH 04 FX 4247), किंमत ₹१०,०००

एकूण मुद्देमाल: ₹६३,०००

ही कारवाई पो.नि. पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार प्रदीप चौधरी, पो.हे.का. निलेश ब्राह्मणकार, पो.को. प्रविण परदेशी, अमजद पठाण आणि सुनील राजपूत यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रदीप चौधरी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!