अँग्लो उर्दू हायस्कूल व जिल्हा परिषद शाळा क्र. 2 समोर स्वच्छता मोहीम राबवली.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूल व जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 समोरील परिसर गेल्या काही दिवसांपासून घाणीच्या विळख्यात सापडला होता. साचलेल्या कचऱ्यामुळे आणि गटारीतील दुर्गंधीमुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत शाळेचे मुख्याध्यापक नाजीम मिर्झा आणि सामाजिक कार्यकर्ते इसहाक मलिक यांनी सातत्याने स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळत, प्रशासनाने तत्काळ पावले उचलून जेसीबीच्या साहाय्याने परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवली.
या उपक्रमांतर्गत साचलेला कचरा, गटारीतील पाणी व इतर घाण पूर्णतः हटवण्यात आली. यामुळे शाळेचा परिसर आता स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी झाला आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.