माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी – पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल.!!!
भडगाव ता. प्रतिनिधी :-आमीन पिंजारी
कजगाव तालुका भडगाव येथील जागृती हिचा विवाह 9 मार्च 2023 रोजी लोकेश विजय सोनगिरे याच्याशी झाला होता. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले असले तरी त्यानंतर तिच्यावर मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. पती लोकेश याने वारंवार दारू पिऊन तिच्याशी मारहाण केली तसेच शिवीगाळ करून त्रास दिला.
जागृतीने सांगितले की, पती, सासू, सासरे, नणंद आणि जेठ यांनी मिळून तिच्यावर माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी लादली. नाशिक येथे घर घेण्यासाठी ही रक्कम आवश्यक असल्याचं कारण देत तगादा लावण्यात आला. मात्र तिच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ती रक्कम देता येणार नाही असं सांगितल्यानंतरही तिचा छळ सुरूच राहिला.
त्रास सहन करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर जागृतीने जळगाव महिला दक्षता समितीकडे अर्ज सादर केला. तिथेही योग्य तो तोडगा न निघाल्याने अखेर भडगाव पोलीस स्टेशनला तिने तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भडगाव पोलिसांनी पती लोकेश विजय सोनगिरे, सासू, सासरे, नणंद व जेठ यांच्याविरोधात भारतीय दंड विधान 1860 अंतर्गत कलम 498-A (पत्नीचा छळ), 323 (मारहाण), 504 (शब्दांनी अपमान), 506 (जीवे मारण्याची धमकी) आणि 34 (सामूहिक हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
जागृती व तिच्या कुटुंबियांनी शासनाकडे योग्य न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.