लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. योगासनांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. योगासनांमुळे शरीर तंदरुस्त तर मन प्रसन्न राहते. नियमित योगासने केल्यामुळे शरीराची निगा राखली जाते.
चांगल्या सवयी निरोगी आयुष्य प्रदान करतात. अशा स्वरूपाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. ताडासन,वृक्षासन, चक्रासन, शवासन, पद्मासन, वज्रासन, हलासन,पवन मुक्तासन, भुजंगासन, धनुरासन, सूर्यनमस्कार इत्यादी योगासनांचे प्रकार करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षकांनी सांगितलेल्या सूचनेनुसार योगासनांचा सराव केला. श्री सुयोग पाटील व श्री अनंत हिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न झाला. शाळेतील श्रीमती संगीता शेलार, सुनिता देवरे, अनिता सैंदाणे, श्री अनंत हिरे,सुयोग पाटील, सचिन पाटील,किरण पाटील व चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.