राज्य स्तरीय उत्कृष्ट संघटक पुरस्काराने किशोर भाऊ रायसाकडा सन्मानित.!!!
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी :–
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित रोप्यमहोत्सव प्रसंगी, राज्य स्तरीय उत्कृष्ट संघटक पुरस्कार किशोर भाऊ रायसाकड यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा. संजय शिरसाठ यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे देण्यात आला.
किशोर भाऊ रायसाकड हे पत्रकार संघटनात्मक कार्यात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असून, त्यांचे काम सातत्यपूर्ण, संघटनात्मक बळकटतेकडे नेणारे आणि पत्रकार हितासाठी प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे अध्यक्ष संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे विविध जिल्ह्यांतील मान्यवर पत्रकार, संपादक, आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. किशोर भाऊ रायसाकड यांच्या सन्मानाने उपस्थितांत आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.