शारदा उर्फ पूजा बागुल ह्या महिलेच्या हत्येसाठी जादुटोणाचा वापर करणाऱ्या मांत्रिका सह संबंधित इसमांनवर जादुटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करा;अंनिस संघटनेच्या वतीने भडगाव पोलिस निरिक्षकांना निवेदन.!!!

भडगाव प्रतिनिधी :-
धुळे येथे दि. २९/०५/२०२५ रोजी कै.सौ.शारदा उर्फ पूजा बागुल(माळी)हिचा अमानुषपणे छळ करून खून करण्यात आला होता भडगाव येथील माहेरवाशीन असलेल्या महिलेवर झालेल्या अन्याया विरोधात दोषींवर महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई व्हावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस), भडगाव शाखेच्या वतीने करण्यात आली. यासाठी आज दिनांक ९ जून रोजी भडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक.पांडुरंग पवार यांना निवेदन देण्यात आले.
सदर कायदा अंनिसच्या प्रयत्नांमुळेच लागू झाला असून, अंनिस सातत्याने समाजात प्रबोधन करत आहे की करणी, भानामती, मांत्रिकांचे दावे हे अंधश्रद्धा असून त्यातून खरोखर कोणावरही परिणाम होत नाही. करणीच्या नावाखाली एखाद्याला इजा करणे वा ठार मारणे हा गंभीर गुन्हा आहे.
या प्रसंगी अंनिसचे युनुस खान, सुबोध पाटील, डॉ. अतुल देशमुख, डॉ. अविनाश भंगाळे, नागेश वाघ, डॉ. विलास पाटील, फिरोज, इम्रानली सय्यद, सौ. योजना पाटील, डी.डी. पाटील सर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. दीपक मराठे आणि श्री. योगेश शिंपी यांचे मार्गदर्शन लाभले.