विहिरीत पडून ४३ वर्षीय इसमाचा मृत्यू.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – येथे आशापुरी नगरातील ४३ वर्षीय इसमाचा वाघरे शिवारातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.महेंद्र विश्वासराव पवार असे मृत इसमाचे नाव आहे.
दिनाक नऊ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास महेंद्र पवार हे कोणालाही काही न सांगता घरून निघाले होते. तालुक्यातील वाघरे शिवारात पॉलिटेक्निक कॉलेज जवळील विहिरीत ते मृतावस्थेत आढळून आले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद होऊन पुढील तपास पोकॉ डॉ शरद पाटील करीत आहेत.