पार्थ पवार यांचे निकटवर्तीय ओंकार हजारे यांचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

0 111

पार्थ पवार यांचे निकटवर्तीय ओंकार हजारे यांचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

सोलापूर :-

सोलापूरातील युवा नेते आणि पार्थ पवार यांचे निकटवर्तीय ओंकार हजारे यांचा मृतदेह त्यांच्या घरासमोरील कारमध्ये आढळून आला. या घटनेमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं.?

रविवारी दुपारी ओंकार हजारे आपल्या घरासमोर पार्क केलेल्या कारमध्ये बसले होते. दुपार उलटूनही ते बाहेर न आल्यामुळे घरच्यांना व शेजाऱ्यांना चिंता वाटू लागली. कारच्या काचेतून पाहिल्यानंतर ते सीटवर निपचित अवस्थेत आढळले. तात्काळ दरवाजा उघडून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

प्राथमिक तपास सुरू

सोलापूर पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून, आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नेमकं कारण शवविच्छेदन आणि तपासानंतरच स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पार्थ पवार यांचे विश्वासू सहकारी

हजारे हे सोलापूरमधील सक्रिय युवा नेते होते. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक आणि राजकीय कामात सक्रीय सहभाग घेतला होता. जिल्ह्यात त्यांची ओळख एक कार्यशील आणि अभ्यासू कार्यकर्ता म्हणून होती.

शोकसागरात मित्र परिवार

या दुर्दैवी घटनेनंतर हजारे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शोकाचं वातावरण आहे. अनेकांनी सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, त्यांना “सामाजिक कार्याचा झंझावात नेता” म्हणून स्मरण केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!