रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी; तिन महिन्यांचे रेशन एकदाच –३० जूनपर्यंतच उचल आवश्यक.!!!
जळगाव प्रतिनिधी :-
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने रेशन कार्डधारकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे रेशन एकदाच देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, ३० जूनपर्यंतच धान्य उचलणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कोण लाभार्थी.?
अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी या दोन्ही गटांतील लाभार्थ्यांना हे रेशन दिले जाणार आहे.
योजनेमागील कारण:
पावसाळ्यात संभाव्य पूर, अतिवृष्टी किंवा वाहतूक अडथळ्यांमुळे लाभार्थ्यांना रेशन मिळण्यात अडथळे येऊ नयेत म्हणून ही उपाययोजना राबवली जात आहे.
लाभार्थ्यांसाठी सूचना:
जून महिन्याचे रेशन त्वरित घ्या जुलै व ऑगस्टचे रेशन ३० जूनपूर्वीच उचला उशीर केल्यास रेशन मिळण्यात समस्या निर्माण होऊ शकते
पुरवठा विभागाचे आवाहन:
सर्व शिधापत्रिका धारकांनी वेळेवर रेशन उचलून शासनाच्या या उपक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.