जबरी चोरी करुन वृध्द महिलेचा खुन करणाऱ्या अज्ञात आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळगांव हरे. पोलीसांनी ४८ तासांत आवळल्या मुसक्या.!!!

0 556

जबरी चोरी करुन वृध्द महिलेचा खुन करणाऱ्या अज्ञात आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळगांव हरे. पोलीसांनी ४८ तासांत आवळल्या मुसक्या.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन हददीतील शेवाळे गावामध्ये दि. 5/6/2025 रोजी रात्री 9.00 वा ते 11.00 वा ते दरम्यान श्रीमती जनाबाई महारु पाटील वय 85 यांच्या राहत्या घरामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने प्रवेश करुन श्रीमती जनाबाई पाटील यांच्या डोक्यात टणक हत्याराने वार करुन त्यांच्या कानातील सोन्याचे दागीने

जबरदस्तीने चोरुन घेवुन जावुन त्यांचा खुन केला वगैरे मजकुराची मयताचा मुलगा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन

पिंपळगांव हरे. पोलीस स्टेशन गु र नं 151/2025 भारतिय न्याय संहिता कलम 103 ( 1 ),311,332अ प्रमाणे

दि.6/6/2025 रोजी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी मा. पोलीस अधीक्षक सो. जळगांव श्री.माहेश्वर रेडडी यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगांव तसेच पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन यांना गोपनिय माहिती काढुन समांतर तपासाबाबत सुचना

दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन कडील तपास पथक यांनी वाडी शेवाळे गावामध्ये गोपनिय माहिती काढुन तपासांती एकुण 3 आरोपींची नावे 1) साहील मुकददर तडवी, वय 21 वर्षे, 2) राकेश बळीराम हातागडे, वय 21 वर्षे ) राजेश अनिल हातागडे, वय 18 वर्षे सर्व रा. शेवाळे ता.पाचोरा

जि. जळगांव असे निष्पन्न करण्यात आले आहेत. सदर तीनही आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडेस सदर गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगत असुन मयत श्रीमती जनाबाई महारु पाटील यांच्या घराच्या ओटया समोर यातील आरोपी हे नेहमी बसायचे व टिंगल टवाळक्या करायचे म्हणुन श्रीमती जनाबाई पाटील यांनी त्यांना खडसावल्याचा राग मनात ठेवुन आरोपी यांनी शेवाळे गावामध्येच श्रीमती.जनाबाई महारु पाटील यांच्या घरी जावुन त्यांचेकडेस चोरी करायची व त्यांचा काटा काढायचा असा कट रचुन ठरलेल्या कटाप्रमाणे दि. 5/6/2025 रोजी रात्री श्रीमती. जनाबाई महारु पाटील यांच्या घराच्या मागच्या दरवाजाने आत प्रवेश करुन श्रीमती.जनाबाई महारु पाटील यांना टणक हत्याराने मारहाण करुन त्यांचा खुन केला व त्यांच्या कानातील सोन्याचे दागीने ओरबडुन घेवुन अंधाराचा फायदा घेवुन आम्ही तेथुन पळुन गेलो. अशी कबुली तीनही आरोपी देत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो. जळगांव डॉ.श्री.माहेश्वर रेडडी,अप्पर पोलीस अधीक्षक,चाळीसगांव

परिमंडळ श्रीमती कविता नेरकर मॅडम,उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा उपविभाग श्री.धनंजय येरुळे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री.संदिप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक,पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन श्री. प्रकाश काळे,पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा शेखर डोमाळे, शरद बागल सोबत पो.उप निरी. विठठल पवार,ग्रे. पो.उप.निरिक्षक प्रकाश पाटील,पिंपळगाव हरे.सफौ. अतुल वंजारी,पोहेकॉ लक्ष्मण पाटील,पोकॉ जितेंद्र पाटील,भुषण पाटील, किशोर पाटील, चापोहेकॉ भरत पाटील, महेश सोमवंशी, पिंपळगांव

हरे.पो.स्टे. नेमणुकीचे पोहेकॉ नरेंद्र नरवाडे, अभिजित निकम, अमोल पाटील, इमरान पठाण, मुकेश लोकरे, नामदेव

इंगळे, मुकेश तडवी, चा.पोकॉ. सागर पाटील अशांनी केली असुन पुढील तपास पिंपळगांव हरे.पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!