लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; जळगाव मधील एका हॉटेलमध्ये घडली घटना.!!!

0 63

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; जळगाव मधील एका हॉटेलमध्ये घडली घटना.!!!

जळगाव प्रतिनिधी:-

लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक व अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अशीच एक घटना जळगाव शहरात उघडकीस आली असून, यामध्ये सुरत येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील रहिवासी विनोद शिवराम कुसळकर (वय ३५) याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये नेले. १८ मे रोजी दुपारी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान पीडितेवर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तिने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

पीडित तरुणी सध्या सुरत येथे नोकरी करत असून, आपल्या उपजीविकेसाठी तेथे वास्तव्य करत आहे. तिने दिनांक १ जून रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांन्वये बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सदर प्रकरणाचा तपास जळगाव शहर पोलीस करीत असून, अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!