गोंडगाव विदयालयाच्या मुख्याध्यापक पदि बापुसाहेब श्री. बी. जी. नन्नवरे रुजु.!!!
भडगाव ता प्रतिनिधी:-
रा. स. शि. प्र. मंडळ संचलीत गोंडगाव माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसाहेब श्री. कल्याणराव वाघ यांची माध्यमिक विदयालय दहिवद ता. चाळीसगाव येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी गोंडगाव विदयालयाच्या मुख्याध्यापक पदि बापुसाहेब श्री. बी. जी. नन्नवरे हे नुकतेच रुजु झाले आहेत. त्यांची बहाळ माध्यमिक विदयालयातुन गोंडगाव माध्यमिक विदयालयात बदली झाली असुन ते विदयालयात रुजु झाले आहेत. यावेळी विदयालयामार्फत बापुसाहेब श्री. बी. जी. नन्नवरे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ शिक्षक श्री. एस. वाय. पाटील, श्री.बी. डी. बोरसे, श्री.एस. आर. महाजन, श्री.एन. ए. मोरे, श्री.एस. जी. भोपे, श्री.पी. जे. देशमुख, श्री. ए. एम. परदेशी, श्री. एस. एल.मोरे, श्री. व्हि. एम. जाधव आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.