चाळीसगावात पोलिसावर खंडणीचा गुन्हा; आमदार मंगेश चव्हाण यांचा ठिय्या आंदोलन.!!!

0 293

चाळीसगावात पोलिसावर खंडणीचा गुन्हा; आमदार मंगेश चव्हाण यांचा ठिय्या आंदोलन.!!!

चाळीसगाव प्रतिनिधी :-

चाळीसगाव शहरातील एका संगणक व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी शहरातील पोलीस हवालदार अजय पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत, तडजोडीनंतर १ लाख २० हजार रुपयांची खंडणी स्वीकारल्याचा आरोप आहे.

 

या प्रकरणी व्यावसायिक स्वप्नील राखुंडे यांनी तक्रार दाखल केली असून, यानंतर स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट चाळीसगाव पोलीस स्टेशन गाठून चार तास ठिय्या दिला. त्यांनी पोलिस प्रशासनावर दबाव टाकत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

 

पोलिसांनी हवालदार अजय पाटील यांच्या घरी झाडाझडती घेतली असता खंडणीचे १.२० लाख रुपये जप्त करण्यात आले. तसेच त्यांचा मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

 

या प्रकाराचा तीव्र निषेध करत आमदार चव्हाण यांनी सांगितले की, “मतदारसंघात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.” तसेच त्यांनी या प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याकडून व्हावी अशी मागणी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक व विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करण्याची घोषणाही केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!