भडगाव तालुक्यातील वाडे गावात चारचाकी गाडीची नंबर प्लेट चोरी.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील वाडे येथील श्री. सावता मंगल कार्यालयाजवळील रहिवाशी अशोक बळीराम कोळी यांच्या घरासमोर लावलेल्या चारचाकी गाडीची नंबर प्लेट चोरुन नेल्याची घटना घडलेली आहे.
त्यादिवशी अशोक कोळी यांच्याकडे भडगाव तालुक्यातील पासर्डी ता. पाचोरा जि. जळगाव येथे विरांचा कार्यक्रम होता.
याच दिवशी चोरटयांनी संधी साधली अन चारचाकी गाडीची नंबर फ्लेट चोरुन नेली आहे. या चोरीच्या घटनेने गावात खळबळ उडालेली आहे.
भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रारी अर्ज देण्यात आला आहे. पोलीसांनी या घटनेचा छडा लावावा अशी अपेक्षा नागरीकांची आहे.