वाडे येथे सालदाराने पळवली शेतकरी मालकाची मोटारसायकल.!!!
पोलीसात तक्रारी अर्ज.
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील वाडे येथील सुपडु गंगाराम मोरे यांच्या शेतात लावलेली मोटार सायकल चक्क सालदारानेच चोरुन नेल्याची घटना घडलेली आहे. भडगाव पोलीस स्टेशनला मोटार सायकल मालक सुपडु गंगाराम मोरे यांनी सालदारा विरोधात तक्रारी अर्ज दिला आहे. या तक्रारी अर्जावर शेतकरी सुपडु मोरे यांची सही आहे. या चोरीच्या घटनेने वाडे परीसरात मोठी खळबळ उडालेली आहे. ही घटना दि. १३ रोजीच्या मध्यराञीच्या अंधारात घडलेली आहे.
याबाबत माहिती अशी कि, वाडे येथील शेतकरी सुपडु गंगाराम मोरे यांची शेती वाडे ते वाघळी रस्त्यालगत आहे. त्यांच्याकडे ३ वर्षापासुन भायला सैनानी रा. पटेल फल्या आमझेरी चाच्या रीया बडवानी मध्यप्रदेश हा सालदार म्हणुन जवळपास ३ वर्षापासुन सालदारकीचे काम करीत होता. त्याने मालकाचे मन जिंकुन चांगले काम केले. यावर्षी अक्षयतृतीया सणापासुन त्याने सालदारकीचे काम सोडले. माञ शेतकरी सुपडु मोरे यांनी ठरविलेल्या सालाप्रमाणे १ लाख १० हजार रुपये रक्कम देऊनही पुढील वर्षासाठी अडव्हान्स ६५ हजार रुपये दिल्याचे शेतकरी सुपडु मोरे यांनी दै.लोकमतशी बोलतांना दिली. माञ भायला सैनानी या सालदाराने कामात कुचराई केल्याने ८ दिवसापासुन त्याला या शेतकर्याने काम बंद केले होते.
माञ या सालदाराचा परीवार शेतात नव्हता परंतु शेतातील खोलीमध्ये त्याचे संसाराचे साहीत्य पडलेले होते. ते साहीत्य घेण्यासाठी हा सालदार आलेला होता. त्याने शेतात ४ ते ५ दिवसाचा तळ ठोखला होता. साहीत्य घेऊन जाईल म्हणुन या शेतकर्याने वाट पाहीली. परंतु याच दरम्यान दि. १३ रोजी राञीच्या अंधारात सुपडु मोरे हे शेतकरी शेतात झोपले असतांना या सालदाराने त्यांच्या खिशातील मोटार सायकलीची चाबी काढुन मोटार सायकल नं. एम. एच. डी. डब्यु ०१८९ ही गाढी घेऊन पोबारा केला. म्हणुन शेतकरी सुपडु गंगाराम मोरे रा. वाडे. ता. भडगाव. यांनी भडगाव पोलीस तक्रारी अर्ज दिला असुन पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा. अशी मागणी शेतकरी वर्गातुन होतांना दिसत आहे. इतर शेतकर्यांवर ही वेळ येऊ नये सावधानता बाळगावी अशी अपेक्षा वाडे येथील शेतकरी सुपडु मोरे यांनी दै. लोकमतशी बोलतांना व्यक्त केली आहे.