भडगाव क्रिकेट अकॅडमी तिरंगा रॅलीचे आयोजन.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
राष्ट्रप्रथम या भूमिकेवर भडगाव क्रिकेट अकॅडमी तर्फे भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते.
यावेळी भडगाव क्रिकेट अकॅडमी चे 80 खेळाडू व रवींद्र वाडेकर, परिक्षीत पाटील, चेतन खैरनार, प्रा डॉ लक्ष्मण कांबळे सर, जाकीर कुरेशी, प्रा अतुल देशमुख, गणेश देशमुख सर, नरेंद्र पाटील, प्रशांत सोळंकी सर, कल्पेश सांगवीकर, रोहित मोरे, हरीश परदेशी, प्रणव ठाकरे, गौरव बागुल दर्शन बाविस्कर, हेमंत खैरनार सर आदी मान्यवर या रॅलीत सहभागी झाले होते.
आज दि.14 सकाळी 8 वाजता भडगाव क्रिकेट अकॅडमी तर्फे भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. भडगाव नगर परिषद येथून या रॅलीला सुरुवात झाली. मेन रोड मार्गे छञपती शिवाजी महाराज चौकातून भडगाव तहसील कार्यालय पर्यंत ही रॅली काढण्यात आली होती. वंदे मातरम्, भारत माता की जय, भारतीय सैन्य जवानांचा विजय असो, आदी घोषणांनी यावेळी परिसर दणाणून निघाला होता.
तहसील कार्यालय परिसरात रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी भारतीय सैन्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली. यावेळी पोलिसांनी वाहतूक मार्ग सुरळीत करण्यासाठी मदत केली.