बांबरुड प्र. ब. गृप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदि चंदाबाई परदेशी बिनविरोध.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील बांबरुड प्र. ब. गृप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचीत सरपंच पदि चंदाबाई रतन परदेशी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. शकुंतला प्रकाश परदेशी यांनी ठरल्या प्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त जागेसाठी हा निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नवनिर्वाचीत सरपंच चंदाबाई परदेशी यांचा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, नागरीकांनी सत्कार केला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन कजगाव मंडळ अधिकारी राजश्री जानराव यांनी कामकाज पाहीले. यावेळी उपसरपंच गौतम भिका देवरे , शकुंतला प्रकाश परदेशी, ज्योती निंबा पाटील, मालताबाई मच्छिंद्र परदेशी, संगीताबाई पंडित माळी, रत्नाबाई विजय परदेशी, मिनाबाई सुभाष मोरे, बारकु रामचंद्र भिल आदि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी जे. के. लोनिया, कर्मचारी परमेश्वर पाटील यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी भडगाव शेतकरी सहकारी संघाचे संचालक राजेंद्र बापु परदेशी, भडगाव पंचायत समितीच्या माजी सभापती रत्नाबाई पाटील, संजय गांधी निराधार कमेटीचे माजी सदस्य विनोद परदेशी, भडगाव व्हाईस आफ मिडीया पञकार संघाचे अध्यक्ष अशोकबापु परदेशी , पोलीस काॅन्सटेबल नरेंद्र विसपुते, माजी सरपंच रमेश पाटील, गोंडगाव पञकार सतीष पाटील, रतन परदेशी, माजी उपसरपंच सरदार परदेशी, माजी उपसरपंच भिकन परदेशी, यशवंत पाटील, सीताराम पाटील, सुभाष पाटील, निंबा पाटील, प्रकाश परदेशी, सुभाष मोरे, संतोष देवरे, जयराम पाटील, रुपचंद परदेशी, कैलास परदेशी, मोहन परदेशी, सुभाष परदेशी, भगवान परदेशी, भुषण पाटील, रोशन पाटील, दिलीप परदेशी, रतन देवरे, भिमसिंग परदेशी, विठ्ठल परदेशी, भरत परदेशी, विकी पाटील, विशाल परदेशी, सचीन पाटील, राजेंद्र पाटील यांचेसह नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.