वादळी वाऱ्यासह पावसाने लावली जोरदार हजेरी.वादळ वाऱ्यामुळे सात ते आठ तास विद्युत पुरवठा खंडित.!!!
आमीन पिंजारी भडगाव ता. प्रतिनिधी:-
कजगाव तालुका भडगाव परिसरात सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठे नुकसान झाले आहे , शेत शिवारात काढलेल्या उन्हाळी मका ,ज्वारी , बाजरी, सह गुरांसाठी केलेली चाऱ्याचे कुट्टी पाण्यापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू होते, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,
दिनांक सहा च्या सायंकाळी पाच वाजता सुमारास सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती, तर दुसरीकडे आडात व्यापारांच्या उघड्यावर असलेल्या मका ज्वारी हे सारे झाकण्यासाठी व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली होती,
या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या व अडत व्यापाऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे, यातच कजगाव परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सात ते आठ तास बत्ती गुल असल्याने गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.