वडजी येथे भडगाव तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल व्हॅन फिरती लोक अदालत व शिबीर यशस्वी.!!!
वडजी येथे भडगाव तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल व्हॅन फिरती लोक अदालत व शिबीर यशस्वी.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
वडजी: भडगाव तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघाच्या संयुक्त प्रयत्नातून वडजी येथे आयोजित केलेली मोबाईल व्हॅन फिरती लोक अदालत व शिबीर आज दि.25 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 ते 11 वाजे पर्यंत महादेवाच्या पारावर वडजी येथे यशस्वीरित्या संपन्न झाली.
या लोक अदालतीमुळे परिसरातील अनेक पक्षकारांना त्यांच्या प्रलंबित प्रकरणांवर जागेवरच तोडगा काढण्याची संधी मिळाली.
या यशस्वी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.न्या. .पी. व्ही. राजळे मॅडम उपस्थित होते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत अनेक प्रकरणांवर दोन्ही पक्षांच्या सहमतीने सामोपचारिक तोडगा काढण्यात आला.
मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून वडजी आणि आसपासच्या गावांतील नागरिकांपर्यंत ही लोक अदालत पोहोचली, ज्यामुळे त्यांना भडगाव येथे न येता आपल्या समस्यांचे निराकरण करण्याची सोय झाली.
दिवाणी, फौजदारी आणि इतर तत्सम प्रकरणांवर या लोक अदालतीमध्ये सुनावणी झाली आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वादांवर तोडगा निघाला, ज्यामुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना मा.न्या. पी. व्ही. राजळे मॅडम यांनी विधी सेवा समिती आणि वकील संघाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
त्यांनी सांगितले की, फिरती लोक अदालत ही सामान्य नागरिकांपर्यंत न्याय पोहोचवण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.
यामुळे वेळेची आणि खर्चाची बचत होते आणि दोन्ही पक्षांमध्ये सलोखा निर्माण होतो.
त्यांनी पक्षकारांना लोक अदालतीच्या माध्यमातून आपले वाद मिटवण्याचे महत्त्व पटवून दिले.
या यशस्वी आयोजनात भडगाव तालुका विधी सेवा समितीचे सदस्य तथा समांतर विधी सेवा समिती चे विजय देशपांडे,दिपक मराठे,निलेश मालपुरे,ईश्वरसिंग परदेशी,वाल्मिक पाटील,विठ्ठल पाटील आणि वकील संघाच्या ॲड बी,आर.पाटील,ॲड.के.आर. पाटील (जनसेवा सुविधा विषयी), ॲड.पी.बी.तिवारी (विधी सेवा मेडीएशन विषयी ),ॲड.के.टी. पाटील(जमिन महसुल विषयी ),ॲड.निलेश तिवारी (भारतीय संविधान विषयी ), यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले.तर ॲड महेंद्र पाटील, ॲड.बी.टी.अहिरे,ॲड.हेमंत कुलकर्णी!ॲड. मुकुंद पाटील,ॲड.विजय महाजन,ॲड कल्पेश पवार,ॲड.विनोद महाजन पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
त्यांच्या प्रयत्नांमुळेच ही मोबाईल व्हॅन फिरती लोक अदालत व शिबीर वडजी येथे यशस्वी झाली. परिसरातील नागरिकांनी देखील या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या प्रकरणांवर तोडगा काढला.
एकंदरीत, भडगाव तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने वडजी येथे आयोजित केलेली मोबाईल व्हॅन फिरती लोक अदालत न्यायालयीन कर्मचारी सचिन रानडे (पर्यावर वसुंधरा व विधी सेवा विषयी) मार्गदर्शन केले,अनिल गोंधणे,नितिन पाटील,दिपक पाटील,रमेश चव्हाण,राजेंद्र माळी,किरण मोरे,वैदेही पाटील यांनी शिबीर अत्यंत यशस्वी केले.
आणि यामुळे अनेक गरजूंना न्याय मिळाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड.बी.टी.अहिरे तर आभार प्रदर्शन ॲड हेमंत कुलकर्णी यांनी केले.