हज यात्रेला जाणाऱ्या हाजी बांधवांचा सत्कार.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव शहरातील हज यात्रेला जाणाऱ्या हाजी बांधवांचा सत्कार नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम हाजी जाकीर कुरेशी यांनी आयोजित केला होता आणि नोरानी लॉन्स येथे हा समारंभ पार पडला.
या सत्काराच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. हाजी मोहसीन खाटीक, इमरान अली सय्यद, हाजी कदीर खान,भडगाव पो.स्टे.चे एस आय,इकबाल शेख, मा. केंद्र प्रमुख. महेमूद खान सर,अफजल खान, निसार खान, साबीर खान,नजीर मुजावर यांच्यासह पत्रकार अबरार मिर्झा,डॉ. एन आर शेख,डॉ.अफरोज शेख, डॉ.इस्माईल सय्यद, डॉ अरशद शेख,सलाउद्दीन शेख दानिश शेठ, भिवंडी, सलीम मिर्झा भिवंडी,आणि हाय्युम अली.एच. बी.ए.इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक मुजम्मील शेख सर, राही मल्टीपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष दानिश आलम, जि प उर्दू बॉईज शाळेचे मुख्याध्यापक जाहीद सर, उर्दू कन्या नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक नईम शेख सर, अशफाक सर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या प्रसंगी हज यात्रेला जाणारे मुफ्ती शकील, रियाजद्दीन मुजावर, बिलाल कुरेशी,मोहसीन खाटीक, शमशोद्दीन शेख,डॉ.असद खाटीक,मुख्तार शेख आणि मोहसीन खान सर,सय्यद मुजफ्फरअली (गुड्डू टेलर) हज यात्रेला जाणाऱ्या भाग्यवान लोकांचा यथोचित सत्कार करण्यात आले.
हा सत्कार हाजी बांधवांसाठी निश्चितच एक आंनदाई क्षण होता.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रमजान खान,रऊप सर,इसरार खान, कुरेशी आमीन सर, शफिक सर, कुरेशी शाकीर खान, कुरेशी साबीर खान, शाहरुख पिंजारी, आदींनी परिश्रम घेतलं
सूत्रसंचालन इमरान अली सय्यद यांनी केले तर आभार हाजी जाकीर कुरेशी यांनी मानले