मुंबई महापालिकेच्या बसमध्ये जोडप्याचे भरदिवसा शारीरिक संबंध.व्हिडीओ व्हायरल.!!!

0 105

मुंबई महापालिकेच्या बसमध्ये जोडप्याचे भरदिवसा शारीरिक संबंध.व्हिडीओ व्हायरल.!!!

नवी मुंबई येथे रविवारी सायंकाळी एक.धक्कादायक प्रकार घडला.पनवेल ते कल्याण दरम्यान धावणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या  बसमध्ये एका तरुण जोडप्याने सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करत बसमध्येच शारीरिक संबंध ठेवले.

महानगर पालिकेच्या रिकाम्या धावत्या एसी बसमध्ये कपल शरीरसंबंध करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका वाहनचालकाने बावीस सेकंदांचा हा व्हिडिओ शूट केलाय.

सार्वजनिक वाहनात अश्लिल चाळे करणे हा गुन्हा आहे. या प्रकरणी बस कंडक्टरला जबाबदार धरले आहे. त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून मिळाली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

रविवार, 20 एप्रिल रोजी ही घटना घडली असून, प्रवासादरम्यान बसमध्ये  जवळ कुणीही नव्हतं. याचाच गैरफायदा घेत एका तरुण जोडप्याने मागच्या सीटवर असभ्य वर्तन केलं. ही घटना एका दुचाकीस्वाराने पाहिली आणि त्याने लगेच 22 सेकंदांचा एक व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ त्याने नवी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला, त्यानंतर तो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला.

या प्रकरणावर नवी मुंबई  महापालिकेच्या परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देताना सांगितलं की, बस कंडक्टरने वेळेत लक्ष न दिल्याने आणि योग्य ती कारवाई न केल्यामुळे त्याच्याविरोधात विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे. सध्या तरी पालिकेने पोलीसांकडे तक्रार दिलेली नाही.

या तरुण जोडप्याचे वय २० च्या आसपास असल्याचे सांगितले जात असून, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी केलेले कृत्य भारतीय कायद्याच्या दृष्टीने गंभीर गुन्हा आहे. भारतीय न्याय संहिता  कलम २९६ नुसार, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्यास तीन महिने तुरुंगवास किंवा ₹१,००० पर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

ही घटना केवळ नैतिकतेच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर कायदेशीरदृष्ट्याही गंभीर मानली जात असून, यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना करणे गरजेचे ठरते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!