भडगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत.!!!
भडगाव प्रतिनिधी:-
मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या दि. ११.०४.२०२५ रोजीच्या आदेशानुसार, भडगाव तालुक्यातील सर्व ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येणार आहे:
जातीनुसार आरक्षण (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण):
अध्यक्ष: तहसिलदार, भडगाव
दिनांक:सोमवार, दि. २१.०४.२०२५
वेळ:सकाळी ११.०० वाजता
स्थळ: पंचायत समिती सभागृह, भडगाव
पद्धत: सोडत
*महिलांसाठी आरक्षण (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला):
अध्यक्ष: मा. उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा
*दिनांक: सोमवार, दि. २१.०४.२०२५
*वेळ: दुपारी ४.०० वाजता
*स्थळ: पंचायत समिती सभागृह, भडगाव
तरी, भडगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच, आजी माजी सदस्य, राजकीय पदाधिकारी, पत्रकार आणि इच्छुक नागरिकांना उपरोक्त वेळी आणि ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार, भडगाव यांच्यातर्फे करण्यात येत आहे.