१५ वर्षाच्या मुलाच्या हाती दिलं ट्रॅक्टरचं स्टेअरिंग विहिरीत कोसळून ८ शेतमजुरांचा मृत्यू.!!!

0 1,318

१५ वर्षाच्या मुलाच्या हाती दिलं ट्रॅक्टरचं स्टेअरिंग विहिरीत कोसळून ८ शेतमजुरांचा मृत्यू.!!!

नांदेड लगतच्या आलेगांव शिवारात एक ट्रॅक्टर विहिरीत पडून ८ शेतमजुरांचा मृत्यू  झाला आहे. हळद काढणीच्या कामासाठी ट्रॅक्टरमध्ये बसून जात असताना हा अपघात झालाय. या विहिरीला कठडा नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येतंय.

दरम्यान, ट्रॅक्टरसह महिलांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी क्रेनची मदत घेण्यात येतेय. या विहिरीला पाणी अधिकचे असल्याने मदतकार्यात अडथळा येतोय.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघात एकूण 10 जण असल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी निवासी जिल्हाधिकारी महेश वदतकर यांनी या संदर्भात माहिती दिली असून 3 जाणंना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अद्याप काही जण विहिरीमध्ये अडकून असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. सध्या घटनास्थळी गावकरी मदतीला हजर आहेत.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर ट्रॅक्टर हा एक १५ वर्षाचा मुलगा चालवत होता, अशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झालं असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा