घरकुल लाभार्थीच्या अनुदानात ५० हजारांची वाढ.!!!
सातारा प्रतिनिधी :-
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याबरोबरच मोफत वीजेसाठी सौर पॅनलसाठी शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज मिळणार असून २०२४-२५ या वर्षात जिल्ह्यातील सुमारे ३७ हजार मंजुर घरकुलांवर सौर ऊर्जा पॅनेल बसणार आहे.
त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना वीज बिलांचा खर्च वाचणार आहे.
राज्यात अनेकांची घरे उघड्यावर आहेत. या गरजूंना निवारा मिळण्यासाठी शासनाने घरकुल योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना
एक लाख वीस हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते. हे अनुदान अत्यंत तोकडे पडत असल्याने शासनाने आणखीन ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने लाभार्थ्यांना आता एक लाख ७० हजार रुपये मिळणार आहेत. याबरोबरच गरजू लाभार्थ्यांना वीजेच्या भरमसाठ दरामुळे वीज बिले भरताना आर्थिक अडचण निर्माण होत होती. त्यामुळे शासनाने घरकुल लाभार्थ्यांना सौर ऊर्जेच्या पॅनेलकरता अनुदान देण्याचाही निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरावर सौर पॅनेल बसणार असून त्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोफत वीज मिळणार आहे. तसेच सौर ऊर्जेचा वाढता वापर करुन पारपारिक ऊर्जेवरील ताण कमी करुन पर्यावरणाचेही संरक्षण होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जुने अनुदा एक लाख २० हजार होते त्यात आता नव्याने ५० हजारांची वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण घरकुलांचे उदिष्टे ४० हजार ४०० घरकुले होते त्यापैकी ३७ हजार २०० मंजुरी मिळाली आहे.
सौर पॅनल अनुदानाबाबत संभ्रम
प्रधानमंत्री आवास योजनेत लाभार्थ्यांना मोफत वीजेसाठी सौर पॅनेलला अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाबाबत अद्यापही लाभार्थ्यामध्ये संभ्रम आहे. लाभार्थ्यांच्या घरावर
सौर पॅनेल महावितरण बसविणार, ग्रामपंचायत अनुदान देणार, जिल्हा परिषद देणार का लाभार्थ्यांचा खात्यात सरकार थेट निधी पाठविणार याबाबत निर्णय होणे अपेक्षित असून लवकरात-लवकर अंमलबजवणी झाली पाहिजे,अशी मागणी होत आहे.