मळगाव उपसरपंच पदि रामकृष्ण मरसाळे यांचा पञकार अशोक परदेशी यांनी केला सत्कार.

0 188

मळगाव उपसरपंच पदि रामकृष्ण मरसाळे यांचा पञकार अशोक परदेशी यांनी केला सत्कार.

भडगाव प्रतिनिधी :—

तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदि रामकृष्ण शामराव मरसाळे यांची नुकतीच सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

 

ही निवड सरपंच कल्पना भिमराव चित्ते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपसरपंच पदाचा ऊषाबाई प्रताप परदेशी यांनी राजीनामा दिल्याने या रिक्त जागेसाठी निवड घेण्यात आली. यावेळी नवनिर्वाचीत उपसरपंच रामकृष्ण मरसाळे यांचा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, नागरीकांनी सत्कार केला. याप्रसंगी सरपंच कल्पना चित्ते, ग्रामपंचायत सदस्य ऊषाबाई परदेशी, गुलाब पाटील, निर्मलाबाई मोरे, शोभाबाई पाटील, साहेबराव सोनवणे आदि सदस्य, ग्रामसेवक रविराज पाटील, शाम चित्ते, प्रताप परदेशी, शैलेश मोरे, हेमराज मरसाळे,प्रताप चित्ते, सेवक गणेश सोनार यांचेसह नागरीक उपस्थित होते.

 

तसेच त्यानंतर उपसरपंच रामकृष्ण मरसाळे यांचा सत्कार भडगावचे पञकार अशोक परदेशी यांनी रुमाल, टोपी, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शिवसेना, भिमशक्ती भडगाव तालुका प्रमुख शैलेश मोरे, भिमराव चित्ते,हेमराज मरसाळे, प्रताप चित्ते, गोपीचंद सोनवणे, कमलबाई मरसाळे , सुनिल मरसाळे आदि नागरीक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!