हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत भडगाव शहरात भव्य इफ्तार पार्टी.!!!
भडगाव प्रतिनिधी:-
सामाजिक एकता आणि सद्भावनेचा संदेश देण्यासाठी हाजी जाकीर कुरेशी यांच्या वतीने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध धर्मीय नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती,सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रमजान हा मुस्लिम समाजासाठी पवित्र महिना असून,या काळात उपवास (रोजा)धरले जातात आणि संध्याकाळी इफ्तारच्या माध्यमातून उपवास सोडला जातो.समाजात बंधुभाव आणि ऐक्य वाढावे, या उद्देशाने हाजी जाकीर कुरेशी यांनी पुढाकार घेत इफ्तार पार्टीचे आयोजन केले.हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात एकोप्याचे अद्वितीय दृश्य पाहायला मिळाले.
या कार्यक्रमात शहरातील विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी एकत्र येऊन इफ्तार केला आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत हिंदू-मुस्लिम ऐक्याची गरज आणि त्याचे महत्त्व यावर भाष्य केले. “धर्म हा जोडण्यासाठी असतो, तोडण्यासाठी नाही,” असे सांगत हाजी जाकीर कुरेशी यांनी सर्वांना सलोखा आणि प्रेम यांचे महत्त्व पटवून दिले.
या वेळी
जेष्ठ नागरिक संघटनेचे
तात्यासाहेब पवार,नवल सर,बी, बी,पाटील सर,संजय देशमुख,डी,टी वाघ सर,गुणवंतरावं जाधव, जी. झेड पाटील सर
माऊली फाउंडेशनचे.उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी,समीर सूर्यवंशी,योगेश शिंपी,प्रवीण पाटील गणेश पाटील,सुशील महाजन,रवींद्र कुलकर्णी,संजय सोनार कळवाडीकर,
माजी नगराध्यक्ष गणेश अण्णा परदेशी,सुनील भाऊ देशमुख, आबासाहेब चौधरी, मोहन सोनार, राजेंद्र अहिरे,
सामाजिक कार्यकर्ते
इमरान अली सय्यद,हाजी मोहसीन खाटीक,निसार खान,फिरोज खान,
पत्रकार
संजय पवार, अबरार मिर्झा,तात्यासाहेब कासार, स्लाउद्दीन शेख, हय्युम अली सय्यद,डॉ.बी.बी भोसले, राजीव दीक्षित, निलेश महाले,उपस्थित होते,
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी
रउफ सर आमीन कुरेशी, साबीर सर, जमील कुरेशी, फारुख पिंजारी, कमिल कुरेशी, रहीम कुरेशी, अकील कुरेशी, नईम कुरेशी, रमजान कुरेशी, सलमान कुरेशी, जिया खान,असरार खान, हाफिज अय्युब कुरेशी, मुनाफ कुरेशी, यांनी परिश्रम घेतले
तर सूत्रसंचालन इमरान अली सय्यद यांनी केले व आभार हाजी जाकिर कुरेशी यांनी मानले