भारतात कोणत्या दिवशी साजरी होणार ईद. ? सौदी अरेबियामध्ये कधी दिसणार चंद्र.?

0 7

भारतात कोणत्या दिवशी साजरी होणार ईद. ? सौदी अरेबियामध्ये कधी दिसणार चंद्र.?

 

रमजान महिन्याची सांगता चंद्राच्या दर्शनाने होते. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्राचं दर्शन झाल्यानंतर ईद हा सण साजला केला जातो. इस्लामिक कॅलेंडर चंद्रावर आधारित आहे.

हिंदू धर्मामध्ये सूर्योदयानंतर नवीन तिथी सुरु होते. त्याप्रमाणे इस्लाममध्ये सूर्यास्तानंतर नवीन तिथी सुरु होते. रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्राचं दर्शन झाल्यानंतर ईद – उल- फित्र हा सण साजरा केला जातो.

 

31 मार्चला ईदची सरकारी सुट्टी

 

इस्लामिक कॅलेंडर चंद्रावर आधारित आहे. प्रत्येक हिजरी महिन्याची सुरुवात चंद्र दिसण्यावर आधारित आहे. ईद -उल- फित्र शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेला साजरी केली जाते. केंद्र सरकारने 31 मार्च रोजी ईद या सणाची सुट्टी जाहीर केली आहे. पण इस्लामिक कॅलेंडरनुसार ईद नेमकी कधी साजरी केली जाईल, ते जाणून घेऊयात.

ईद – उल- फित्र हा मुस्लिम धर्मियांचा महत्त्वाचा सण आहे. असं म्हणतात की या सणाची सुरुवात मोहम्मद पैगंबर यांनी केली होती. हा सण इस्ल्माम धर्मातील एकात्मता आणि आध्यात्मिकतेचा प्रतीक आहे. ईदच्या दिवशी खास नमाज अदा केली जाते. या दिवशी मुस्लिम लोक देवाचे आभार मानतात. तसेच कळत- नकळत झालेल्या आपल्या चुकांविषयी देवाकडे माफी मागतात. रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधव रोजा म्हणजेच उपवास करतात. देवाची प्रार्थना करतात. आयुष्यात कायम सुख – समृद्धी नांदो, यासाठी या दिवशी प्रार्थना केली जाते. रमजान संपल्यानंतर येणाऱ्या या सणाला रोजा सोडण्याचा सण असंही म्हटलं जातं. इस्लाम धर्माचे लोक या सणाची आतुरतेने वाट बघत असतात.

 

भारतात ईद कधी साजरी केली जाईल.? 

 

भारतात 2 मार्च 2025 ला रमजान महिना सुरु झाला. त्या हिशोबाने भारतात 31 मार्च किंवा 1 एप्रिल 2025 ला ईद साजरी केली जाते. ईदची तारीख चंद्रदर्शनानंतर जाहीर केली जाते. सौदी अरबमध्ये आधी चंद्र दिसल्यानंतर ईद साजरी केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतात ईद साजरी होईल.

 

सौदी अरबमध्ये कधी दिसणार चंद्र.? 

भारत आणि अरब देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी ईदचा सण  साजरा केला जातो. सौदी अरबमध्ये ईद साजरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतात ईद साजरी केली जाते. जर सौदी अरबमध्ये 29 मार्चला चंद्र दिसला तर तिथे ईद 30 मार्चला साजरी केली जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा