मुंबई, पुणे व ठाण्याचे निसटते विजय.!!!
कै.भाई नेरूरकर चषक राज्य खो-खो स्पर्धा
इचलकरंजी, दि. 25 मार्च-
कै. भाई नेरूरकर चषक राज्य खो-खो स्पर्धेत मंगळवारी तीन सामने केवळ एका गुणाच्या फरकाने झाले.
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्रमांक 21च्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पुरुष गटात मुंबईने धाराशिवला, पुण्याने ठाणेला तर किशोरी गटात पुण्यानेच ठाणेवर केवळ एका गुणाने मात करीत मंगळवारचा दिवस गाजविला.
पुरुष गटातील चुरशीच्या सामन्यात सनी तांबेचा (1.50, 1.00 मिनिटे 2 गुण) अष्टपैलू खेळ व वेदांत देसाईच्या 5 बळीच्या जोरावर मुंबईने धाराशिवला एक गुणाने नमविले. मध्यंतराची 10-8 ही 2 गुणाची आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली. धाराशिवच्या रवी वसावे (1.30, 1.00 मिनिटे) व श्रीशंभो पेठे (4 गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले. आणखी एका चुरशीच्या सामन्यात पुण्याने ठाणेवर 18-17 अशी एका गुणाानी मात केली. मध्यंतराच्या 9-10 असा एका गुणाच्या पिछाडीवरून पुण्याने बहारदार खेळी करीत विजय खेचून आणला. पुण्याच्या साहिल चिखले याने 7 गडी बाद करीत 1.40 मिनिटे संरक्षण केले. ठाण्याकडून शुभम जाधव 1.10, 1.50 मिनिटे पळती केली.
किशोरी गटातील पुणे विरुद्ध ठाणे हा सामनाही 19-18 असा एका गुणाने झाला. मध्यंतराच्या 9-7 ही दोन गुणाची आघाडीच त्यांनी विजयश्री मिळवून दिली. पुण्याकडून आरती घट्टे ( 1.40 मि. व 5 गुण) तर ठाण्याकडून प्रणिती जगदाळे (2.10 मि. व 5.40 मिनिटे) यांनी अष्टपैलू कामगिरी केली. अन्य गटातील सर्व सामने एकतर्फीच झाले.
अन्य निकाल ः
किशोरः सांगली वि. वि. धाराशिव 14-11 तीन गुण व 5.20 मिनिटे राखून, कोल्हापूर वि. वि. सातारा 20-13 दोन गुण व एक मिनिटे राखून, सातारा वि. वि. ठाणे 13-12 एक गुण व 3 मिनिटे राखून, सांगली वि. वि. नागपूर 17-8 नऊ गुण व डाव राखून, पुणे वि.वि. नागपूर 11-7 एक डाव 4 गुणानी.
किशोरी ः पुणे वि. वि. नागपूर 13-10 एक डाव 3 गुणांनी, सांगली वि. वि. धाराशिव 15-8 सात गुणांनी, ठाणे वि. वि. सोलापूर 14-10, कोल्हापूर वि. वि. बुलढाणा 11-5 एक डाव 6 गुणांनी.
पुरुष ः अहिल्यानगर वि. वि. गडचिरोली 14-12 दोन गुण व 8.20 मिनिटे राखून, सांगली वि.वि. अमरावती 15-14 एक गुण व 7.50 मिनिटे राखून, सोलापूर वि. वि. अमरावती 14-13 एक डाव 1 गुणांनी, कोल्हापूर वि. वि. मुंबई 20-12 आठ गुणांनी.
महिला ः सोलापूर वि. वि. नागपूर 13-10 एक डाव 3 गुणांनी, सांगली वि. वि. अकोला 11-6 एक डाव 5 गुणांनी, कोल्हापूर वि. वि. नाशिक 14-13 एक गुण व 5.50 मिनिटे राखून, धाराशिव वि.वि. मुंबई 12-7 एक डाव 5 गुणांनी, मुंबई वि. वि.अमरावती 9-7 एक डाव 2 गुणांनी.
–