श्री. क्षेञ मांडकी देवस्थानात दि. २८ रोजी भंडारा कार्यक्रम.!!!

0 31

श्री. क्षेञ मांडकी देवस्थानात दि. २८ रोजी भंडारा कार्यक्रम.!!!

भडगाव प्रतिनिधी:-

तालुक्यातील मांडकी येथील श्री. संत सदगुरु देवस्थानात दि. २८ रोजी अमावस्यानिमित्त भंडार्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी ५ वाजता श्रींचे पादयपुजन, सकाळी ७ वाजता आरती, संध्याकाळी ८ वाजता महाआरती नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.अन्नदानाची सेवा मधुकर काशिराम सुर्यवंशी पिंपळगाव बुद्रुक ता. भडगाव तर जलसेवा दादाभाऊ माऊली अॅक्वा गिरड हे स्वखर्चातुन देणार आहेत. तरी दर्शनाचा व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. क्षेञ मांडकी देवस्थानाचे पुजारी तथा प्रवचनकार सुभाष धनराज चौधरी व सर्व ग्रामस्थ,पुजारी मंडळ आदिंमार्फत करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा