भुसावळात सराईत गुंडाची हत्या करून जमिनीत पुरले.!!!

0 201

भुसावळात सराईत गुंडाची हत्या करून जमिनीत पुरले.!!!

भुसावळ प्रतिनिधी :-

जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं प्रकरण ताजं असताना आता भुसावळमध्ये एका गुन्हेगार तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

होळीच्या दिवशी या तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह हा जमिनीत गाडला होता. ७ दिवसानंतर त्याचा मृतदेह समोर आल्यानंतर प्रकरण उघड झालं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळमधील तापी नदीच्या परिसरात ही घटना उघड झाली आहे. मुकेश भालेराव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. मुकेश भालेराव हा भुसावळमध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवर संशयित गुन्हेगार होता. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल होते. 13 मार्च रोजी मुकेशची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. अमोलची हत्या झाली त्यानंतर त्याचा मृतदेह कुणाच्या निदर्शनास येऊ नये म्हणून मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह हा तापी नदी जवळील निर्जनस्थळी जमिनीत पुरला होता. ७ दिवसानंतर जेव्हा मृतदेहातून दुर्दैंधी यायला लागली तेव्हा स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

भुसावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता एक मृतदेह आढळून आला. मृतदेह हा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी जेव्हा मृतदेहाची ओळख पटवली तेव्हा तो अमोल भालेराव याचा असल्याचं समोर आलं.अमोलची पूर्व वैमनस्त्यातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्या करण्यात आलेल्या अमोलविरोधात अनेक गुन्हे दाखल असून त्याला तडीपारही करण्यात आलं होतं.

कुटुंबीयांनी केला गंभीर आरोप

माझ्या मुलाची होळीच्या दिवशी हत्या झाली. पैशाच्या वादातून त्याची हत्या झाली आहे. लाखू लोखंडे आणि त्याच्या कुटुंबीयांनी, माझ्या मुलाचा साला, मावस भाऊ यांनी हत्या केली. १३ तारखेला होळीच्या दिवशी तो गायब झाला होता. आम्ही त्याच्या बायकोला विचारलं तर ते कुठं बाहेर गेले असतील असं सांगितलं. आम्ही घरी जाऊन विचारणा केली तर परदेशात गेला असं त्याची बायको सांगत होती. याआधीही लोखंडे परिवाराने त्याला मारहाण केली होती. ४ ते ५ दिवस हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं होतं. आता सकाळी आम्ही जेव्हा त्याच्या घरी गेलो होतो, त्यावेळीही त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही, असं मृत अमोल भालेरावच्या कुटुंबीयांनी आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून अधिक तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!