रावेर तालुक्यातील मुंजलवाडी शेत शिवारात बिबट्याने गायीच्या 3 वर्षीय वासरास केले फस्त.!!!

0 22

रावेर तालुक्यातील मुंजलवाडी शेत शिवारात बिबट्याने गायीच्या 3 वर्षीय वासरास केले फस्त.!!!

रावेर ता प्रतिनिधी :-

रावेर तालुक्यातील मुंजलवाडी गावापासुन 1 किलो मीटर जवळ देवराम बळीराम पाटील यांच्या शेतात याकुब लालखा तडवी यांची गुरे बसवण्यात आले होते तसेच दि .21 मार्च रोजी सकाळी 7 वाजेला बिबट्याने अचानक गायीच्या 3 वर्षाच्या वासरावर हल्ला करुण पकडून घेऊन जात असतांना गुरेकरी याकुब तडवी यांच्या लक्षात येताच त्यांनी सुद्धा बिबट्याचा जवळ पास अर्धा किलोमीटर पाठलाग करुण वासराला सोडविले असता त्याचे माने पासुन दोन भाग वेगळे केले होते ही माहीती मुंजलवाडी गावात वाऱ्यासारखी पसरताच मुंजलवाडी गावतील पोलिस पाटील राधेश्याम धनगर, सरपंच अशोक हिवराळे, अतुल पाटील, अय्युब तडवी, सोनू पाटील सुरज हिवराळे यांनी पाहणी करुण वनविभागाला या बाबत सुचवले असता रावेर वन प अधिकारी अजय भवणे यांच्या सूचनेनुसार वन रक्षक ए एच पिंजारी, वन मजुर गुलाब बेग यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच गुरेकरी याकुब लालखा तडवी मुंजलवाडी याची हालाकीची परिस्थिती असुन कुटुंबांचे उदरनिर्वाह यांच्यावरच असून त्यांचे झालेले 25 हजार रुपयांचे नुकसान भरपाई शासनाने द्यावी असे म्हटले आहे

तसेच गावातील नागरिकामध्ये भितीचे वातावरण असुन नागरिकांनी वनविभाग यांनी वासराला फस्त केल्या ठिकाणी तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे, सदरहुन शेतकरी तसेच ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळेस शेतात जात असतांना एकटे न जाता सामुहीक पद्धत ने जावे असे आवाहन वन रक्षक यांनी ग्रामस्थांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा