जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा गावात माजी उपसरपंचाची चॉपरने वार करून हत्या.!!!

0 24

जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा गावात माजी उपसरपंचाची चॉपरने वार करून हत्या.!!!

जळगांव प्रतिनिधी:-

जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा गावात एका धक्कादायक घटनेत माजी उपसरपंचाची चॉपरने वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. युवराज कोळी असे हत्या झालेल्या माजी उपसरपंचाचे नाव आहे. या घटनेत अधिक माहिती समोर आली आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जवळील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घृण खून झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खडबड उडाली आहे. युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

गावातीलच तिघांनी आज (दि. 21) सकाळी आठ वाजेच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढविला. चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार चढवल्याने ते जागीच कोसळले. जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह आणण्यात आला असून नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला आहे. कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण असून खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा