भडगाव शहरातील सराफ दुकानाच्या मागिल भिंत फोडून ६ किलो चांदी आणि रोकड चोरी.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव येथील प्रसिद्ध सराफा दुकानामध्ये जबरी चोरी झाली आहे. ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून ६ किलो चांदी आणि रोकड लंपास करण्यात आली आहे.
दोन दिवसांपासून दुकान बंद असल्यामुळे चोरट्यांनी संधी साधली आहे. भडगाव शहरातील घोडके ज्वेलर्सच्या दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
भडगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या घोडके ज्वेलर्सच्या दुकानाची मागची भिंत चोरट्यांनी फोडली आणि सहा किलो चांदी आणि रोख रक्कम लंपास केली आहे. दोन दिवसांपासून दुकान बंद असल्याने चोरट्यांनी चोरी केली. चोरीच्या या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे.
दोन दिवस दुकान बंद
घोडके सराफ दुकानाचे मालक बाहेरगावी गेल्यामुळे दुकान बंद होते. चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील चांदी आणि रोकड लंपास केली. शहराच्या मध्यवर्ती भागात धाडसी चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चोरट्यांनी भिंत फोडण्यासाठी वापरलेली हत्यारे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेत आहेत.
मंगळवारी सकाळी घोडके सराफ ज्वेलर्समध्ये चोरीची घटना घडल्याचं उघडकीस आलं. सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडली आणि दुकानात प्रवेश केला. दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी समोर दिसलेली चांदी आणि गल्ल्यातील रोख रक्कम ताब्यात घेतली आणि यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. मंगळवारी सकाळी ज्वेलर्स दुकान उघडण्यासाठी कर्मचारी आले तेव्हा त्यांना दुकानाची भिंत फोडलेली दिसली, यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पंचनामा केला.
चोरीच्या या घटनेमुळे आजूबाजूच्या सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घोडके सराफ दुकानाचे मालक बाहेरगावी जाणार असल्याची माहिती चोरांना कशी मिळाली.? ओळखीच्याच कुणीतरी चोरट्यांना याबाबत माहिती दिली का.? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. तसंच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचं कामही पोलिसांकडून होत आहे.