राज्य खो खो स्पर्धेसाठी आर.आर.विद्यालयाच्या 10 महिला खेळाडूंची जिल्हा संघात निवड होऊन सहभागी झाल्याबद्दल सत्कार

0 20

राज्य खो खो स्पर्धेसाठी आर.आर.विद्यालयाच्या 10 महिला खेळाडूंची जिल्हा संघात निवड होऊन सहभागी झाल्याबद्दल सत्कार

 

महाराष्ट्र खो खो असोसिएशनने सन 2024 – 25 या वर्षाची पुरुष व महिला या विभागाची 60 वि हिरक महोत्सवी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे 13 ते 16 मार्च 2025 या कालावधीत संपन्न झाली. या स्पर्धेत जळगाव जिल्हा महिला संघ सहभागी झाला होता त्या संघात आर आर विद्यालयातील 10 खेळाडूंची निवड झाली होती.

 

त्यांची नावे पुढील प्रमाणे हेतल पाटील, विभा सोनवणे, पूर्वा पाटील, सोनाली घेन्गट, अंतरा सराफ, पूर्वी सोनवणे , उन्नती सोनवणे, यज्ञा पवार , भाग्यश्री कोठी,लावण्या बडगुजर ह्या सहभागी झाल्या बद्दल त्यांचे प्रमाणपत्र व गुलाबगुच्छ देऊन अभिनंदन करन्यात आले त्या प्रसंगी श्री.यु.बी.जाधव मुख्याध्यापक, श्री डी.टी.पाटील उपमुख्याध्यापक,जेष्ठ शिक्षक श्री.एस.आर.पिले , श्री.जे.जी.पोळ, श्री व्ही.एस.रोकडे हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा