अपघातजळगावमहाराष्ट्र

मिरची बाजारात भीषण आग कोट्यवधींचे नुकसान.!!!

 मिरची बाजारात भीषण आग कोट्यवधींचे नुकसान.!!!

चाळीसगाव प्रतिनिधी:-

शहरातील नागद रोडवरील मिरची बाजारात.आज दुपारी लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली. आगीचे प्रचंड लोळ आणि धुराचे लोट दूरवरून स्पष्टपणे दिसत होते, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या आगीमुळं परिसरात मोठ्या प्रमाणावर धोक्याचे लोट पसरले असून घटनेच्या शेजारी पेट्रोल पंप असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये अधिक घबराट निर्माण झाली आहे. आगीमुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या आगीत १२ दुकानांसह एक मालट्रक व दुचाकी जळून खाक झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

 

याबाबत असे की, चाळीसगाव शहरातील नागद रोडवर मिरची बाजार आहे. या मिरची बाजाराला आज दुपारी भीषण आग लागली. मिरची बाजारात मोठ्या प्रमाणात मिरची आणि इतर शेतमालाचा साठा होता. जो या आगीत जळून खाक झाला असण्याची शक्यता आहे. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच या आगीत एक ट्रक देखील जळून खाक झाला असल्याची माहिती समोर आलीय. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

दरम्यान आग लागलेल्या घटनाशेजारीच पेट्रोल पंप असल्याने परिसरात एकच धावपळ उडाली आहे. अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत सुरु आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झालेली नाही. मात्र, आगीमुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पोलिस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत करत आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!