जिल्हा परिषद शाळेत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवात साजरी.!!!
आमीन पिंजारी भडगाव ता.प्रतिनिधी :-
कजगाव तालुका भडगाव येथे जिल्हापरिषद कन्या शाळा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली, यावेळी माजी सरपंच भानुदास महाजन यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले,
तसेच मान्यवरांनी व शाळेच्या मुला मुलींनी आपल्या भाषणातून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले, शाळेच्या मुलांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा धारण केल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले होतें, यावेळी ग्रामपंचायत सदस्य मांगीलाल मोरे, शाळेचे मुख्याध्यापक सुनील महाजन सर, ऐश्वर्या मॅडम, रमेश कुमावत, शुभम महाजन, तसेच गावातील नागरिक शाळेतील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.