४५०० रुपयाची लाच घेतांना महावितरणचे सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात.!!!
चोपडा प्रतिनिधी :-
विज मिटर बसवून देण्यासाठी ४५०० रुपयाची लाच घेतांना चोपडा शहरातील म.रा.वि.वि.कचे सहायक अभियंता अमित सुलक्षणे हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
प्रथम ५५०० व तडजोडअंती ४५०० रुपयाची मागणी करून ही लाच रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुध्द चोपडा शहर पो.स्टे. येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या घरी नवीन विज मिटर बसवून देण्या करीता सहायक अभियंता यांनी ५५०० रूपये लाचेची मागणी केले बाबत तक्रारदार यांनी ११ मार्च रोजी ल. प्. वि. जळगाव घटकाचे सापळा पथकाकडे तक्रार लिहून दिली होती. सदर तक्रारीची पडताळणी केली असता वरील सहायक अभियंता यांनी तक्रारदार यांच्या घराचे विज मिटर बसवून देण्यासाठी प्रथम ५५०० व तडजोडअंती ४५०० रुपयाची मागणी करून सदर लाच रक्कम १२ मार्च रोजी स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुध्द चोपडा शहर पो.स्टे. येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – जळगाव
तक्रारदार- पुरूष वय- 23 वर्षे
आरोपीचे सक्षम अधिकारी :- मुख्य अभियंता म. रा.वि.वि.मर्या कंपनी जळगाव.
सापळा व तपासी अधिकारी :-श्रीमती नेत्रा जाधव, पोलीस निरीक्षक , लाप्रवि,जळगाव
सापळा कार्यवाही पथक :- श्रेणी पोलिस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पो ना/मराठे, पो ना/राकेश दुसाने