30 मार्च 2025 ला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार .?
महाराष्ट्राच्या राजकारणातील लक्षेवधी दिवस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं. महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांची, ते विभक्त झाल्यापासून इच्छा आहे.
यासाठी कार्यकर्ते नेहमीच प्रयत्नही करत असतात. काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले होते. मराठी सेनेचे मोहनिश राऊळ यांनी ते बॅनर्स लावले होते. आता पुन्हा एकदा मोहनिश राऊळ यांनी ठाकरे बंधूंसाठी बंधू मिलन कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे.
आता वेळ आलीये, दोन्ही भावांनी मराठी माणसासाठी, राज्यासाठी एकत्र यावं अशी इच्छा शिवसैनिकांनी व्यक्त केली. दोन्ही फायरब्रँड नेत्यांनी एकत्र यावं यासाठी कार्यकर्त्यांकडून सातत्याने प्रयत्नही केले जातात. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हि लोकांची भावना आहे, मात्र राज ठाकरे कधी इकडे असतात तर कधी तिकडे असतात. असा टोला अंबादास दानवे यांनी लागलाय.
ठाकरे बंधुंसाठी 30 मार्चला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आता या कार्यक्रमाला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का? मराठी जनांची इच्छा पुरी होणार का हे पाहावं लागेल. यामुळे 30 मार्च 2025 हा महाराष्ट्राच्या राजकारणातील लक्षेवधी दिवस ठरणार आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिवसेनेनं धक्का दिला आहे. पिंपरी चिंचवडमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या म्हणून सुलभा उबाळे यांनी काम पाहिलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील गटातटाच्या राजकारणाला कंटाळून आपण बाहेर पडत असल्याचं, सुलभा उबाळे यांनी सांगितलंय.