नोटबंदीत बाद झालेल्या 500, 1000 च्या नोटांचं पुढे काय झालं.? ऐकून बसेल धक्का.!!!

0 1,039

नोटबंदीत बाद झालेल्या 500, 1000 च्या नोटांचं पुढे काय झालं.? ऐकून बसेल धक्का.!!!

 

नोटबंदी होऊन आता जवळपास 10 वर्ष होत आली.पण नोटबंदीचा फटका अजुनही अनेक बँकाना बसतोय. राज्यातील अनेक बँकामध्ये आजही जुन्या नोटा अक्षरशः धूळ खात पडल्यात. रिझर्व बँकेने या नोटा जमा करून घ्यायला नकार दिल्याने या नोटांचं करायचं काय ?

असा प्रश्न निर्माण झाला.नोटा बदलून द्यायला रिझर्व बँकेने नकार देशात 8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदी झाली.अचानक 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बंद झाल्या. त्या आठवणी आजही आपल्याला आठवत असतील. मात्र या जुन्या नोटांमुळे आजही राज्यातील जिल्हा बँका अडचणीत आहेत.नोटबंदीच्या काळानंतर ठराविक नोटा बदलून दिल्यानंतर इतर नोटा बदलून द्यायला रिझर्व बँकेने नकार दिलाय.. यामुळे सध्याच्या घडीला जिल्हा बँकांकडे कोट्यावधी रुपये पडून आहेत. याबाबत नाबार्डने काही उणीव नाही ना यासाठी बँकेचे व्यवहारही तपासले. त्यामध्ये नाबार्डला कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या नाहीत, तरी देखील रिझर्व बँक जिल्हा बँकांकडे शिल्लक असणाऱ्या जुन्या नोटा घ्यायला तयार नाही.

 

नोटबंदीच्या बाद नोटांचं ओझं जिल्हा बँकांवर

 

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 25 कोटी 27 लाख 29 हजार 500 रुपयांचा नोटा पडून आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 14 कोटी 72 लाख रुपयांच्या जुन्या नोटा आहेत.पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत 22 कोटी 25 लाख जुन्या नोटा आहेत. तर नागपुर जिल्हा बँक 5 कोटींच्या जुन्या नोटा आजही सांभाळतीये

 

जुन्या नोटांबाबत ठोस निर्णयाची मागणी

 

नोटबंदीला आता 10 वर्ष होत आली तरी राज्यातील अनेक बँकांमध्ये जुन्या नोटांचे ढिग आहेत. या जुन्या नोटांमुळे सर्वच बँकाना दरवर्षी व्याज आणि नफ्यावर पाणी सोडावं लागतंय.यामुळे राज्यभरातील जिल्हा बँकेतील या जुन्या नोटांबाबत ठोस निर्णयाची मागणी होतीये.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!