पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे धावत्या दुचाकीवरून पडून महिला ठार.!!!

0 29

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे धावत्या दुचाकीवरून पडून महिला ठार.!!!

पाचोरा प्रतिनिधी:-

तालुक्यातील खडकदेवळा नजीक एक दुर्दैवी घटना घडली. ज्यात धावत्या मोटरसायकलवरून पडल्याने विवाहित महिलेचा मृत्यू झाला. सरुबाई भिकन पाटील (वय – ३९ वर्ष, रा.सारोळा ता. पाचोरा) असं मयत महिलेचं नाव असून याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीआहे.

 

या घटनेबाबत असे की, सरुबाई पाटील ह्या पती भिकन पाटील यांचेसह छत्रपती संभाजी नगर येथे नातेवाईकांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. दरम्यान मंगळवारी १२ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर येथुन आपल्या सारोळा या गावी येत असतांनाच खडकदेवळा गावाजवळ रस्त्यांची झालेली दुरावस्था यात मोटरसायकलवर मागे बसलेल्या सरुबाई पाटील यांचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या व त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सारोळा सह परिसरात शोककळा पसरली आहे.

 

दरम्यान या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विकास खरे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा