इन्स्टाग्रामवर ओळख, दोघांमध्ये कधीही शारीरिक संबंध नाहीत, तरीही गर्भवती असल्याचं सांगत ब्लॅकमेल छळाला कंटाळून 28 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन.!!!

0 40

इन्स्टाग्रामवर ओळख, दोघांमध्ये कधीही शारीरिक संबंध नाहीत, तरीही गर्भवती असल्याचं सांगत ब्लॅकमेल छळाला कंटाळून 28 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन.!!!

मुंबई:-

इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून २८ वर्षीय तरुणाने गळ्यावरून चाकू फिरवत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

सचिन मेघजी गाला (वय-२८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मुंबईतील जोगेश्वरी परिसरात राहत होता.

 

इन्स्टाग्रामवर ओळख झालेली तरुणी कधीही मयत तरुणाला भेटायला आली नव्हती. त्याच्यासोबत फिरायला गेली नव्हती, तरीही तरुणीने आपण प्रेग्नंट असल्याचे सांगत तरुणाला ब्लॅकमेल केले. तरुणीच्या या छळाला कंटाळून तरुणाने जीवन संपवले आहे.

 

 

अधिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सचिन याची ओळख इन्स्टाग्रामवर मुस्कान नावाच्या तरुणीसोबत झाली होती. दोघांमध्ये बऱ्याच गप्पा व्हायच्या. पुढे या ओळखीचे रुपांतर घट्ट मैत्रीत झाले. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होते. दोघांमध्ये कधीही शारीरिक संबंध आले नव्हते. शिवाय दोघे एकत्रित कुठे फिरायलाही गेले नव्हते.

 

 

तरीही मुस्कान गर्भवती असल्याचे सांगून सचिनला ब्लॅकमेल करत होती. मागील काही दिवसांपासून मुस्कान सचिनचा अधिकचा मानसिक छळ करू लागली.

या छळाला कंटाळून अखेर सचिनने २६ फेब्रुवारी रोजी राहत्या घरात गळ्यावरून चाकू फिरवून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला उपचारासाठी कोकीलाबेन आणि नंतर सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान ४ मार्चला सचिनचा मृत्यू झाला. याप्रकरणी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा