11 वीत शिकणारा विद्यार्थी 3 मुलांच्या आईला घेऊन पळाला भूर्रर्र.!!!

महाराष्ट्रातील घटनेने उडाली खळबळ

0 1,361

11 वीत शिकणारा विद्यार्थी 3 मुलांच्या आईला घेऊन पळाला भूर्रर्र.!!!

महाराष्ट्रातील घटनेने उडाली खळबळ

नागपूर :-

नागपूर गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी पथकाने एक विचित्र घटना उघडकीय आणली. एका ११ वीच्या एका विद्यार्थ्याला तीन मुलांची आई असलेल्या ३६ वर्षीय महिलेसोबत ताब्यात घेण्यात आले. हे दोघेही पळून गेले होते.

मुलाच्या पालकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने या मुलाची सुटका केली. पोलिसांनी या महिलेविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

दोनदा घडलाय प्रकार

हा अकरावीतील मुलगी व या महिलेची काही दिवसांपूर्वी ओळख झाली. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध जमले. या महिलेला तीन मुले आहेत. विशेष म्हणजे या महिलेच्या मोठ्या मुलापेक्षा तिच्यासोबत पळून गेलेला मुलगा हा फक्त चार वर्षांनी मोठा आहे. हे दोघेही शेजारीच राहतात. त्यामुळे त्यांचे सूत जुळले. मुलाच्या वडिलांना या प्रकाराची कुणकूण लागताच त्यांनी मुलाला समजावले. मात्र वर्षभरात ते दोनदा पळून गेल्याचे सांगितले गेले.

पालकांचा झाला नाईलाज

या दोघांच्या प्रकरणाची घरच्यांना माहिती मिळाल्यावर मुलाच्या वडिलांनी त्याला बाहेरगावी नातेवाईकांकडे पाठवले. परंतु, तरीही हा मुलगा महिलेसोबत पळून गेला. या घटनेनंतर, पीडितेच्या पालकांनी लकडगंज पोलिस ठाण्यात संपर्क साधला जिथे पोलिस अधिकाऱ्यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. महिलेच्या कुटुंबाने बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवल्याचे वृत्त आहे.

महिलेला मिळाला जामीन

या प्रकरणाबाबत वरिष्ठ निरीक्षक ललिता तोडसे म्हणाल्या की, महिला आणि किशोरवयीन मुलाचे समुपदेशन करण्यात आले. त्यांनी असेही सांगितले की, महिलेला लकडगंज पोलिस ठाण्यात सोपवण्यात आले जिथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अटकेनंतर महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे तिला जामीन मंजूर करण्यात आला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा