भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बस स्थानक परिसरातील हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण गावकऱ्यांच्या पुढाकाराने काढण्यात आले. 

0 44

भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बस स्थानक परिसरातील हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण गावकऱ्यांच्या पुढाकाराने काढण्यात आले. 

 

भडगाव ता.प्रतिनिधी :-

कजगाव येथील बस स्टँड परिसरातील हातगाडी वाल्यांचे अतिक्रमण सात ते आठ दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्या पुढाकारणाने काढण्यात आले,

 

बस स्टँड परिसर काही प्रमाणात मोकळा झाला असून मात्र बेकायदेशीर रित्या बस स्टँडच्या आजूबाजूला पक्के अतिक्रमण धारकांचे काय असा सवाल नागरिकांनी उपलब्ध केला आहे,

 

 

यासंदर्भात गावातील काही नागरिकांनी जळगाव येथे दिनांक 6/3/ 2025 रोजी जिल्हा अधिकारी यांची भेट घेऊन अतिक्रमण बाबतच्या समस्या सांगितले व त्या संदर्भात निवेदन दिले

 

 

असून त्यासोबत पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी दिलेले पत्र देखील देण्यात आले आहे,

 

 

आता याकडे माननीय जिल्हा अधिकारी साहेब काय कारवाई करता याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे, कजगाव येथील अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून उद्भवत असून देखील संबंधित शासन पर शासन याकडे सातत्याने काना डोळ्यात करत असल्याने अतिक्रमणाचा वाद गावात वाढत चालला असल्याने याकडे संबंधित अधिकारी जिल्हा अधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन पक्के अतिक्रमण धारकांवर त्वरित कारवाई करावी

 

 

अशी मागणी गावातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षापासून होत आहे तरी प्रशासन हे टोकाचे पाऊल उचलत नसल्याने अतिक्रमणधारकांना अभय मिळत आहे, गावात अतिक्रमणधारकांमुळे अनेकांचे वाद-विवाद एकोपाला जातात गावात हात गाडीवर धंदा करणाऱ्यांना अतिक्रम धारक नाहक त्रास देत असल्याने बऱ्याच वेळा हाणामाऱ्या सुद्धा होत असतात तरी संबंधित अधिकाऱ्यांनी अतिक्रमण धारकांवर कठोर अशी कारवाई करून कजगाव गाव कजगाव बस स्टँड परिसर स्टेशन रोड नागद रोड भडगाव रोड चाळीसगाव रोड त्वरित अतिक्रमण मुक्त करावे अशी मागणी गावातून जोर धरू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा