जवान जितेंद्र चौधरींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.!!!
अंत्यदर्शनासाठी जनसमुदाय लोटला
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – येथील भूमिपुत्र व केंद्रीय रिझर्व पोलिस दलातील जवान जितेंद्र देविदास चौधरी (४१) यांना श्रीनगर येथे कर्तव्यावर असताना मंगळवारी दि ४ रोजी वीरमरण आले.त्यांचे पार्थिव बुधवारी दि ५ रोजी पारोळा येथे विशेष वाहनाने आणण्यात आले.येथे त्यांचावर दुपारी सवा तीन वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड जनसमुदाय लोटला होता.
जितेंद्र चौधरी हे केंद्रीय रिझर्व पोलीस दलाचा (सीआरपीएफ) १०२ बी/११७ बटालियनमध्ये सेवा बजावत होते.विविध ठिकाणी त्यांनी सेवा केली.अलीकडे ते श्रीनगर येथे कार्यरत होते.मंगळवारी कर्तव्यावर असताना सकाळी कॅम्पमध्ये अचानक त्यांचा छातीत दुखून आल्याने त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात तात्काळ नेण्यात आले.तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.या वृत्ताने पारोळा शहर परिसरात शोककळा पसरली. जितेंद्र चौधरी यांचे पार्थिव पुणे येथे आणण्यात आले तेथून पार्थिव पारोळा येथे बुधवारी दुपारी एकच्या सुमारास विशेष वाहनाने आणण्यात आले. यावेळी परिवारातील सदस्यांनी एकच हंबरडा फोडला.सवाद्य डी जे वर विशाल तिरंगा ध्वज लहेरावत शहरातून त्यांची अंत्ययात्रा मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली,फुलांनी चौक सजवण्यात आली.यावेळी देशभक्तीचा गीतांनी संपूर्ण परिसर दणाणला होता.अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे,भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.अंतिम ठिकाणी लोकप्रतिनिधी शासकीय अशासकीय,राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.अखेरचा निरोप देताना अनेकांचे मन गहिवरून गेले.जितेंद्र चौधरी यांना त्यांचा पुतण्या व लहान मुलगी यांनी अग्नीडाग दिला. यावेळी मृणालीताई पाटील,
प्रभारी तहसीलदार अनिल पाटील,मुख्याधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण,पोलीस निरीक्षक सुनिल पवार,माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे,माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, अमृत चौधरी,कैलास चौधरी, जनसेवक पी जी पाटील, सीआरपीएफ बटालियन अधिकारी तसेच समाज बांधवांसह शहर
परिसरातील आजी माजी फौजी,
सैनिक यांचेसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.