सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी भडगांव शिवसेना युवासेना तर्फे निषेध मोर्चा.!!!
पोलिस उप निरीक्षक यांना जाहिर निषेध निवेदन
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी भडगांव शिवसेना युवासेना तर्फे निषेध मोर्चा.!!!
पोलिस उप निरीक्षक यांना जाहिर निषेध निवेदन
वाल्मीक कराड सह गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
भडगांव प्रतिनिधी :-
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घुण हत्या हा केवळ एक गुन्हा नाही, तर माणुसकीवरचा मोठा डाग आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज सांयकाळी भडगांव शिवसेना युवासेनेच्या वतीने जाहिर निषेध मोर्चा काढत भडगांव पोलिस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले
याबाबत निवेदना असे म्हटले आहे की एके काळी साधा पाणक्या असलेल्या वाल्मिक कराड या गुंडाने बीडमध्ये दहशतीचं साम्राज्य उभं केलं, सामान्य नागरिकांन पासून ग्रामसेवक, सरपंच, नगरसेवकांपर्यंत सर्वांना धाकात ठेवलं. अखेर त्याच्या अमानुष प्रवृत्तीचा बळी सरपंच संतोष देशमुख ठरले
या भ्याड कृत्या विरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चा काढण्यात येत आहे. शिवसेना-युवासेना भडगाव तर्फे देखील मोर्चा काढण्यात आला. यावेळी “वाल्मिक कराडला भर चौकात फाशी द्या” अशी मागणी राज्य सरकारकडे आम्ही केली.गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांवर तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आज जर गुन्हेगारीला मोकळीक दिली, तर उद्या पुन्हा कोणी तरी संतोष देशमुख सारख्या न्यायप्रिय माणसाचा बळी जाईल.
यावेळी संपूर्ण भडगाव शिवसेना आणि युवासेना देशमुख कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील. या आंदोलनात सर्व भडगाव तालुका युवासेना शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.