आगामी येणाऱ्या होळी व रमजान ईद सणाच्या पार्श्वभुमीवर भडगांव पोलिसांचा रूट मार्च.!!!
भडगांव प्रतिनिधी :-
आगामी येणाऱ्या होळी व रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक ४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता भडगाव पोलिस स्टेशन येथुन पोलिसांचा रुट मार्च काढण्यात आला
भडगांव पोलिसांच्या पथकाने पथसंचलन करून पथकाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. आगामी येणाऱ्या होळी व रमजान ईद सण शांतता व कायदा सुव्यवस्थेत पार पडावा
यासाठी पोलिसांची तयारी सुरू आहे.
त्याच अनुषंगाने भडगाव पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये पोलिसांनी पथसंचलन केले.
भडगाव येथील मेन रोड सोनार गल्ली,आझाद चौक,भडगाव नगरपरिषद,पठाण वाडा मेंढ्या मारुती,अब्दुल हमीद चौक, टोणगांव , मार्गे बस स्टँड परिसर या मुख्य रस्त्यावर करण्यात आलेल्या पथसंचलनात भडगांव पो.स्टे च्या पोलिस ठाण्याचे ३ अधिकारी २० कर्मचारी तसेच ६० होमगार्ड सहभागी झाले होते.