७ वर्षीय खदीजा बी ने ठेवला पहिला उपवास {रोज़ा }.!!!
रावेर प्रतिनिधी :-
मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना मानला जातो.या
पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण करून रावेरातील हुसैनी मस्जिद जवळील रहिवासी पत्रकार आणि ऑल इंडिया आयडियल टीचर असोसिएशन चे तालुका अध्यक्ष शेख शरीफ शेख सलीम यांची मुलगी खदीजा बी शेख शरीफ (वय ७) याने पहिला रमजानचा रोज़ा आपल्या जीवनातला पहिला रोजा ठेवला. सकाळी ५:२० वाजेपासून ते सायंकाळी ६: ३६ वाजेपर्यंत थोडा फार जेवण करून आणि पाणी च्या आधारावर उपाशी पोटी राहून यांने ( अल्लाह) ईश्वर प्रती श्रद्धा व्यक्त केली एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल या मुलीचे आजी आजोबा नातेवाईक पत्रकार बांधव आणि शिक्षण विभागातर्फे खदीजा बी चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.